यवतमाळकरांनो! कोरोनामुळे दोन्ही पालक गमावल्यास चिंता नको, बालकांसाठी विशेष टास्क फोर्स

Corona
Corona esakal
Updated on

यवतमाळ : कोरोनामुळे (coronavirus) दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्यायहक्क मिळवून देऊन त्यांचे यथायोग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने आवश्‍यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरावर कृती दल (टास्क फोर्स) (task force to care child) निर्माण करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी या टास्क फोर्सचे अध्यक्ष असून, महिला व बालविकास अधिकारी (women and child development) हे सदस्य सचिव, तर जिल्हा बालसंरक्षण अधिकारी समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. (task force to care of children who lost their both parents due to corona in yavatmal)

Corona
सहा महिन्यापासून रेशनच्या धान्यासाठी 'त्यांची' वणवण; अधिकारी देतात सतत हुलकावणी

सध्यास्थितीत कोरोना विषाणूचा वाढलेला संसर्ग, बाधित व्यक्तींचे व मृत्यूचे वाढलेले प्रमाण विचारात घेता त्याचा बालकांच्या जीवनावरसुद्धा गंभीर परिणाम होत आहे. त्यातच काही प्रसंगी कोविडमुळे दोन्ही पालकांचे निधन झाल्याने अनाथ झालेल्या मुलांची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या बालकांची काळजी घेणारे कोणीही नसल्याने ही बालके शोषणास बळी पडण्याची व बालकामगार किंवा मुलांची तस्करीसारख्या गुन्ह्यांना बळी पडण्याची शक्‍यता जास्त आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानेदेखील जिल्हास्तरावर टास्क फोर्स गठित करण्याचे निर्देश दिले आहेत.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या टास्क फोर्समध्ये जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाचे सचिव, जिल्हा बालकल्याण समितीचे अध्यक्ष, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी हे सदस्य म्हणून आहेत. त्यात जिल्हाधिकारी हे प्रमुख म्हणून टास्क फोर्सच्या कामकाजावर संपूर्ण नियंत्रण ठेवतील. कोविडमुळे दोन्ही पालक गमाविलेल्यांची तपशीलवार माहिती समन्वयकांना उपलब्ध करून देण्याबाबत संबंधितास निर्देश देणे, याव्यतिरिक्त दर 15 दिवसांतून एकदा टास्क फोर्सची बैठक होईल.

टास्क फोर्सच्या कार्यप्रणाली चाइल्ड हेल्पलाइन क्रमांक 1098चा माहिती फलक कार्यक्षेत्रातील सर्व रुग्णालयांत दर्शनी भागात लावणे, अनाथ, निराश्रित बालकांना समुपदेशन व मदत करणे, बालकांच्या दत्तक विधानाबाबत समाजमाध्यमांत चुकीचे संदेश पसरविणाऱ्यांवर कारवाई करणे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या बालगृहे, निरीक्षण गृहाकरिता स्वतंत्र वैद्यकीय पथक नियुक्त करणे आदींचा समावेश आहे, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ज्योती कडू यांनी कळविले आहे.

चुकीच्या संदेशांना बळी पडू नका -

कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची मोठी सामाजिक समस्या निर्माण होत आहे. अशा बालकांना मदत करण्यासंदर्भात समाज माध्यमांद्वारे अनेक चुकीचे संदेश, गैरसमज पसरविले जात आहेत. मात्र, अशा संदेशांना कुणीही बळी पडू नये. याबाबत कोणतीही माहिती आवश्‍यक असल्यास चाइल्ड लाइन क्रमांक 1098 किंवा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com