एसटी बसच्या धडकेत दिव्यांग शिक्षकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 जानेवारी 2020

रस्त्यांवर अपघात झाला नाही, असा एकही दिवस जात नाही. दररोज मोठ्या संख्येने रस्त्यांवर येणारी वाहने अपघातांना कारणीभूत असली, तरी त्यामागील मानवी चुका हे प्रमुख कारण आहे. केवळ रस्त्यांवरून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनांच्या अपघातांमध्ये वाढ होत आहे असे नाही; तर पादचारी आणि सायकलस्वारांनाही याचा फटका बसत आहे. 

खामगाव (जिल्हा बुलडाणा) :  रस्त्यांवर अपघात झाला नाही, असा एकही दिवस जात नाही. दररोज मोठ्या संख्येने रस्त्यांवर येणारी वाहने अपघातांना कारणीभूत असली, तरी त्यामागील मानवी चुका हे प्रमुख कारण आहे. केवळ रस्त्यांवरून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनांच्या अपघातांमध्ये वाढ होत आहे असे नाही; तर पादचारी आणि सायकलस्वारांनाही याचा फटका बसत आहे. 

आज तर कहरच झाला. पुतणीला शाळेत भेटण्यासाठी जाणाऱ्या रोहणा येथील एका दिव्यांग संगीत विषयाच्या शिक्षकावर काळाने आज घाला घातला. समोरून भरधाव एसटीने त्यांच्या तीनचाकी मोटारसायकलला धडक दिल्याने शिक्षकाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना खामगाव-बुलडाणा मार्गावरील रोहणा फाट्याजवळ घडली.
रोहणा येथील रहिवासी संगित शिक्षक पद्मनाभन नारायण बोचरे (वय 40) हे आज त्यांच्या पुतणीच्या शाळेत एका कार्यक्रमासाठी त्यांची तीनचाकी मोटारसायकल क्रमांक एम. एच. 28 एएल 0964 वरून नांदुराकडे जात होते. त्याचवेळी बुलडाण्याकडून खामगावकडे भरधाव वेगात येणारी अकोला डेपोची बस क्रमांक एम. एच. 06 एस 8905 ने रोहणा फाट्याजवळील आरोग्य केंद्रासमोर शिक्षक बोचरे यांच्या तीनचाकी मोटारसायकलला जोरदार धडक देऊन त्यांना चाकाखाली चिरडले. या अपघातात शिक्षक बोचरे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसही तातडीने अपघातस्थळी पोहोचले. यावेळी पोलिसांनी सदर बसचा चालक दिनेश प्रल्हाद विरघट (वय 39) रा. अकोला यास ताब्यात घेतले आहे. वृत्त लिहेपर्यंत पोलिसांची कारवाई सुरू होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teacher dies after being hit by ST bus