‘Save Schools, Save Education’ : शिक्षकांनी काढली शासन आदेशाची ‘अंत्ययात्रा’; ‘शाळा वाचवा, शिक्षण वाचवा’च्या घोषणा
School Teachers Rally in Amravati : शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी अमरावतीत प्रहार संघटनेने विभागीय आयुक्त कार्यालयावर जोरदार आंदोलन छेडले. प्रतीकात्मक अंत्ययात्रा, घोषणाबाजी आणि नंतरच्या पोलिस कारवाईमुळे वातावरण तणावपूर्ण झाले.
अमरावती : शिक्षकांच्या प्रलंबित समस्या व ग्रामीण शिक्षण व्यवस्थेच्या मुद्द्यावर प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने येथील विभागीय आयुक्तालयावर सुरू असलेल्या आंदोलनाने आज आक्रमक वळण घेतले.