Teacher Promotion: महाराष्ट्र शासनाच्या नवीन अधिसूचनेनुसार, पदनाम नसलेल्या वरिष्ठ शिक्षकांना केंद्रप्रमुख पदासाठी अपात्र ठरवण्यात आले आहे, ज्यामुळे शिक्षकांमध्ये असंतोष पसरला आहे. शिक्षक संघटनांकडून याच्या विरोधात मागणी केली जात आहे.
अमरावती : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या १८ जुलै २०२५ च्या अधिसूचनेमुळे जिल्हा परिषद शाळांतील अनेक ज्येष्ठ शिक्षक पदोन्नतीपासून वंचित राहणार असल्याचा दावा करीत शासनाच्या या निर्णयाने शिक्षकांमध्ये असंतोष पसरला आहे.