Wardha News : मोबाइलवर बोलण्यास रोखल्याने मुलीचे पलायन; वर्धा येथून पोलिसांनी घेतले ताब्यात
Mobile Addiction : मोबाईल वापरण्यावरून आईने केलेल्या किरकिरमुळे १७ वर्षीय मुलगी घरातून निघून गेली. पोलिसांच्या प्रयत्नातून ती वर्ध्यात आढळून आली आणि सुखरूप कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आली.
नागपूर : मोबाइल वापरण्यास हटकल्याने १७ वर्षीय मुलीला हटकल्याने तिने घरातून पलायन केले. दरम्यान ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पथकाकडून तिला वर्ध्यातून ताब्यात घेण्यात आले.