
संग्रामपूर : तालुक्यात अवैध रेती वाहतुक करणाऱ्यांवर तहसीलदारांनी कारवाईची धडक मोहीम सुरू केली आहे. दरम्यान एका आठवड्यात चार कारवाई करत ३ वाहने जप्त करून पोस्टेला लावण्यात आली आहेत. याप्रकरणी गुन्हे सुध्दा दाखल करण्यात आले असून यामुळे रेती माफीयांचे धाबे दणाणले आहेत.