Yavatmal Crime : तेलंगणाच्या व्यापाऱ्याची १७ किलो चांदी लंपास
Silver Bag Theft : यवतमाळ जिल्ह्यातील मोहदा येथील ढाब्याजवळ तेलंगणातील व्यापाऱ्याची १७ किलो चांदीची बॅग चोरीला गेली. आठ लाख रुपये किमतीचे दागिने ट्रॅव्हल्स बसमधून चोरट्याने लांबवले.
यवतमाळ : अमरावती-हैदराबाद ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्या तेलंगणाच्या व्यापाऱ्याची १७ किलो चांदी असलेली बॅग चोरट्याने लांबविली. ही घटना मोहदा येथील हिंदुस्थानी ढाब्याजवळ गुरुवारी घडली.