दहा हजाराची लाच दोघे अँटी करपशनच्या जाळ्यात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bribe crime

दहा हजाराची लाच दोघे अँटी करपशनच्या जाळ्यात

मारेगाव : स्थानिक भुमी अभिलेख कार्यालय येथील प्रभारी उपअधीक्षक व लिपीक यांनी तकारदार यांचे शेतीची मोजणीलवकर करून देण्याकरीता २५,०००/-रूपये लाचेची मागणी करून त्यापैकी तक्रारदार यांनी५,०००/-रूपये प्रतीलीपी लिपिक यांना दिले व उर्वरीत २०,०००/-रूपये लाचेची मागणी असल्याबाबत ता .५ ला तकार प्राप्त झाली. सदर तकारीवरुन दुपारी दोन वाजता च्या दरम्यान करण्यात आलेल्या पडताळणी कार्यवाहीतउपअधीक्षक व प्रतीलिपी लिपीक यांनी तक्रारदार यांचेकडुन यापुर्वी५,०००/-रूपये स्विकारल्याचे मान्य करून तक्रारदार यांना त्यांचे शेतीचे मोजणी करून देण्याकरीता उर्वरीत २०,०००/- रुपयाची मागणी करून तडजोडीअंती १५,०००/- रुपये लाच रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान अविनाश चंद्रकांत पाटील, वय ४७ वर्षे, पद - प्रतिलिपी

लिपीक, भुमी अभिलेख कार्यालय, मारेगाव रा. घरकुल कॉलनी, जगन्नाथ ढेंगळे यांचे घरी,मारेगाव ता.मारेगाव जि.यवतमाळ मुळ पत्ता - राठी लेआउट,राष्ट्रभाषा रोड, वर्धा, बबन श्रीनिवास सोयाम, वय ५६ वर्ष, पद

मुख्यालय कार्यालयाचा पत्ता

सहायक, अतिरिक्त प्रभार उपअधीक्षक, भुमी अभिलेख

कार्यालय, मारेगाव रा.वैभव नगर आखाडा वार्ड पांढरकवडा यांनी तक्रारदार यांचेकडून १५,०००/-रु. लाच रक्कम स्विकारल्याने दोन्ही संशयितआरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. संशयित आरोपीं विरुध्द पोलीस स्टेशन मारेगाव येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे.सदरची कार्यवाही विशाल गायकवाड, पोलीस अधीक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्र, अमरावती, अरुण सांवत, अपर पोलीस अधीक्षक, श्री.देविदास घेवारे, अपर पोलीस अधीक्षक,अॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती परिक्षेत्र, अमरावती, संजय महाजन, पोलीस उपअधीक्षक यांचेमार्गदर्शनाखाली पो.नि.संतोष इंगळे, पो.ना.युवराज राठोड, निलेश महिंगे, चासफौ.सतिश किटुकलेयांनी पार पाडली.

Web Title: Ten Thousand Bribe Anti Corruption Action Against Deputy Superintendent Clerk Land Records Office

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top