हैदराबादेतून पायीच निघालेले मजूर गोंदियात झाले जखमी...वाचा कसे

गोंदिया : रस्त्याच्या कडेला उलटलेले वाहन व नागरिकांनी केलेली गर्दी.
गोंदिया : रस्त्याच्या कडेला उलटलेले वाहन व नागरिकांनी केलेली गर्दी.

गोंदिया : स्वगावी जाण्यासाठी परतीच्या प्रवासाला निघालेले दहा मजूर वाहन उलटल्याने जखमी झाले. ही घटना रविवारी (ता. 3) पहाटे साडेपाचच्या सुमारास गोंदिया-आमगाव मार्गावरील ठाणा परिसरात घडली. या घटनेत जीवितहानी झाली नसून, वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

कोरोना संसर्गमुळे सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे, परराज्यात कामाच्या शोधात गेलेले मजूर स्वगावी जाण्यासाठी पायीच प्रवासाला निघाले आहेत. रविवारी पहाटे पिकअप (क्रमांक एमएच.35/एजे.1570) वाहन गोंदियाकडून भाजीपाला भरून आमगावकडे निघाले. यावेळी, रस्त्याने लहान मुले, महिला व पुरुष पायी जाताना दिसले. त्यामुळे वाहनचालकाने मदतीचा हात देत त्यांना वाहनात बसवले.

सात मजूर किरकोळ जखमी

गोंदिया-आमगाव मार्गावरील ठाणा परिसरात चालकाचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला उलटले. यात वाहनात बसलेले सात मजूर किरकोळ जखमी झाले. तर, एका मुलासह तीन मजुरांना गंभीर दुखापत झाली. वाहनात अडकलेल्या मजुरांना गावकऱ्यांनी सुखरूप बाहेर काढले. जखमींना उपचाराकरिता 108 रुग्णवाहिकेने केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. प्रथमोपचारादरम्यान मजूर पुढील प्रवासाला निघाले. या घटनेची नोंद वृत्तलिहीपर्यंत संबंधित ठाण्यात करण्यात आली नव्हती.


हैदराबाद येथून मजूर निघाले पायी

या घटनेतील जखमी मजूर हैदराबाद येथे कामाच्या शोधात गेले होते. परंतु, लॉकडाउनमुळे त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाल्याने सर्व मजूर स्वगावी जाण्यासाठी पायी निघाले होते. यातील तीन मजूर मध्यप्रदेश बालाघाट जिल्ह्यातील पालडोंगरी येथील असून, उर्वरित सात मजूर छत्तीसगड राजनांदगाव जिल्ह्यातील नवागाव/बकर कट्टा, तालुका सुईखदान येथील आहेत. यात लहान मुलांसह एका गर्भवतीचाही समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com