esakal | वाघाच्या हल्ल्यात तेंदूपत्ता मजूर ठार; ब्रह्मपुरी वनविभागाच्या दक्षिण वनपरिक्षेत्रातील घटना
sakal

बोलून बातमी शोधा

वाघाच्या हल्ल्यात तेंदूपत्ता मजूर ठार; ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातील घटना

वाघाच्या हल्ल्यात तेंदूपत्ता मजूर ठार; ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातील घटना

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : तेंदूपत्ता तोडण्यासाठी (Tendupatta collection) जंगलात गेलेला मजूर वाघाच्या हल्ल्यात ठार (The laborer was killed in a tiger attack) झाल्याची घटना बुधवारी (ता. २६) सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास वांद्रा नियतक्षेत्रातील जंगल परिसरात घडली. भाऊराव दोडकू जांभुळे (वय ४२, रा. चिचखेडा) असे मृताचे नाव आहे. या घटनेमुळे तेंदूपत्ता मजूर सुन्न झाले आहे. (Tendupatta laborer killed in tiger attack)

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने जंगलव्याप्त भागातील नागरिक तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात जातात. चिचखेडा येथील भाऊराव जांभुळे हे पत्नीसोबत गावाच्या बाजूला असलेल्या जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेले होते. तेंदूपत्ता तोडत असताना झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक मागच्या बाजूने भाऊराव यांच्यावर हल्ला चढविला. त्यानंतर घटनास्थळापासून जवळपास ७ मीटर अंतरावर त्यांना वाघाने ओढत नेले. त्यानंतर पत्नी आणि आजूबाजूला तेंदूपत्ता तोडत असलेल्या नागरिकांनी आरडाओरड केली. त्यामुळे वाघाने तेथून पळून गेला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी जखमी भाऊरावला जंगलाच्या बाहेर आणले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. याची माहिती वनविभागाला देण्यात आली.

हेही वाचा: दुर्दैवी! स्मशानभूमीत ७० मृतांच्या अस्थींची पोती बांधून

वनपरिक्षेत्राधिकारी आशुतोष मेंढे, पूनम ब्राम्हणे, ठाणेदार अनिल कुमरे यांनी घटनास्थळी भेट दिली. मृतदेहाला शवविच्छेदनासाठी ब्रह्मपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, वनविभागाने तातडीने २० हजार रुपयांची मदत मृताच्या कुटुंबीयाला दिली. उर्वरित ४ लाख ८० हजार रुपये रकमेचा धनादेश काही दिवसांत कागदपत्रांची पूर्तता होताच देण्यात येणार असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले. जंगलाच्या परिसरात वनविभागाने कॅमेरे लावले आहेत. त्यानंतर वनविभागाची गस्त वाढविण्यात आली आहे. नागरिकांनी भल्या पहाटे अंधार असताना जंगलात जाऊ नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

(Tendupatta laborer killed in tiger attack)