Petrol Attack on Mahavitaran Office : पेट्रोल ओतून महावितरणच्या कार्यालयाला आग; दोघांना अटक, अभियंत्याच्या अंगावरही पेट्रोल ओतले
Fire at Mahavitaran Office in Amravati : अमरावती जिल्ह्यात वीज खंडित होत असल्याच्या कारणावरून वलगाव वीज उपकेंद्रात घुसून दोघांनी अभियंत्यावर पेट्रोल टाकले व कार्यालय पेटवून दिले. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
अमरावती : सतत खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या कारणावरून जाब विचारण्याकरिता वलगाव उपकेंद्रात गेलेल्या लोकांनी कार्यालयात पेट्रोल ओतून पेटवून दिले. अभियंत्याच्या अंगावरही पेट्रोल टाकल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता.