esakal | केवढी निष्काळजी : क्वारंटाईन सेंटरमधील तंबू कोसळला महिलेच्या अंगावर 
sakal

बोलून बातमी शोधा

The tent in the quarantine center collapsed on the woman

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या इमारतीमध्ये तालुक्यातील नागरिकांसाठी कोविड केअर सेंटरची निर्मिती करण्यात आली. बाहेरून आलेल्या व कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना या ठिकाणी क्वारंटाइन केले जाते.

केवढी निष्काळजी : क्वारंटाईन सेंटरमधील तंबू कोसळला महिलेच्या अंगावर 

sakal_logo
By
भगवान पवनकर

 मोहाडी (जि. भंडारा) : येथील तालुकास्तरावरील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या इमारतीत कोरोना रुग्णांसाठी तयार केलेल्या क्वारंटाइन सेंटरवरील पालाचा तंबू बुधवारी भर पावसात कोसळला. यात एका महिलेला गंभीर दुखापत झाली. या कोविड केअर सेंटरची जबाबदारी इन्सिडेंट अधिकारी तथा तहसीलदार यांच्याकडे आहे. मात्र, यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले. कोरोना सेंटरवरील दुर्लक्षितपणा चव्हाट्यादर आला आहे.
 
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या इमारतीमध्ये तालुक्यातील नागरिकांसाठी कोविड केअर सेंटरची निर्मिती करण्यात आली. बाहेरून आलेल्या व कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना या ठिकाणी क्वारंटाइन केले जाते. जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र  या ठिकाणावरूनच देण्यात येत असल्याने तालुक्यातील नागरिकांची या ठिकाणी वर्दळ असते.  येथील रुग्णांना सेवा देणाऱ्या डॉक्टर व परिचारिकांकरिता या इमारतीतील एक स्वतंत्र  खोली देण्यात आली होती. मात्,र ती खोली पाच दिवसांपूर्वीच खाली करण्यात आली.

अधिक माहितीसाठी - खजूर खा आणि आजारांना विसरा.. जाणून घ्या नियमित खजूर खाण्याचे फायदे...
 

संदर्भीत रुग्णांची तपासणी व प्रमाणपत्र देण्यासाठी पालाचे तंबू तयार करण्यात आले.  पाच आॅगस्टला दिवसभर पाण्याची रिपरिप सुरू असल्याने या ठिकाणी आलेली महिला पाण्याने ओली झाल्याने ती  डॉक्टर व नर्स यांच्यासाठी तयार केलेल्या तंबुत आली.  त्यावेळेस वादळ आल्याने तात्पुरत्या स्वरूपाचा तंबु कोसळल्याने महिलेला डोक्याला गंभीर दुखापत झाली. वेळीच उपचार करण्यात आल्याने सदर घटनेची माहिती इन्सिडेंट अधिकारी तथा तहसीलदार देवदास बाम्बुर्डे  यांना देण्यात आली. मात्र घटनेचे गांभीयाने न घेता दुर्लक्ष केले या ठिकाणी असलेल्या डॉक्टर व नर्स ना धावपळ करावी लागली.  

निगेटिव्ह व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह


 
बुधवारी संस्थात्मक विलगीकरण केंद्रात असलेल्या एका व्यक्तीला कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्याचे सांगून आरोग्य विभागाने त्याला घरी पाठविले. त्यानंतर तो गावात अनेकांच्या संपर्कात आला. आता तीच व्यक्ती अचानक पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने गावात दहशत निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे चप्राड येथील संपूर्ण गावकऱ्यांवर कोरोनाचे संकट आले आहे. चप्राड येथील चार युवक नागपंचमीच्या पूर्वसंध्येला पुणे जिल्ह्यातून गावात आले. त्यांची रवानगी लाखांदूर येथील संस्थात्मक विलगीकरण केंद्रात करण्यात आली. या चारही युवकांच्या घशाचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले. पाच दिवसांनंतर त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे सांगून त्यांना गावी पाठविण्यात आले होते.

अधिकाऱ्याचा निष्काळजीपणा भोवला


याबाबत अधिक माहिती घेतली असता कोविड केअर सेंटरमध्ये रुग्ण तपासणी व उपचाराची जबाबदारी सोपविलेल्या एका वैद्यकीय अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असताना त्याला अन्य निगेटिव्ह युवकांसोबत सोडल्याची चर्चा आहे. तो गावी पोहोचल्यावर कुटुंबीयांसह गावकऱ्यांच्या संपर्कात आल्याने संपूर्ण गाव दहशतीत वावरत आहे. दरम्यान, त्याच्या संपर्कातील अन्य नागरिकांचा शोध घेतला जात असून गावात भीतीचे वातावरण आहे. याप्रकरणी बेजबाबदारपणाचे धोरण अवलंबिणाऱ्या अधिकाऱ्याच्या विरोधात कार्यवाही करावी अशी मागणी जनतेत केली जात आहे.
 

संपादन : अतुल मांगे