Amravati News : अमरावतीत शिक्षक पात्रता परीक्षेदरम्यान परीक्षार्थ्यांना रुमाल व दुपट्टा नेण्यास मनाई केल्याने गोंधळ निर्माण झाला. उकाड्यात घाम पुसण्याचीही मुभा न मिळाल्याने परीक्षार्थ्यांचा संताप व्यक्त झाला.
अमरावती : नियमांची तोडमोड करून आपल्या मनाप्रमाणे नियम तयार करून परीक्षार्थ्यांनाच टार्गेट करण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी (ता.३०) शिक्षक पात्रता परीक्षेदरम्यान (टॅट) परीक्षार्थ्यांना आला.