esakal | ...अन् अपघातग्रस्त रुग्णानेच स्वतःसाठी आणले इंजेक्शन, धामणगाव रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

tetanus vaccine not available in dhamangaon rural hospital of amravati

सर्वसामान्य रुग्णांसाठी जीवनदायिनी असलेल्या ग्रामीण रुग्णालयात सध्या औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयाच्या भांडारात औषध नसल्याने नातेवाइकांना बाहेरून औषधे आणावी लागत आहेत.

...अन् अपघातग्रस्त रुग्णानेच स्वतःसाठी आणले इंजेक्शन, धामणगाव रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

sakal_logo
By
सुधीर भारती

धामणगावरेल्वे (जि. अमरावती) : सामान्यपणे अपघात झाला की जखमींना रुग्णालयात नेऊन उपचार करणे हा नेहमीचा शिरस्ता. मात्र, धामणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात चक्क अपघातग्रस्त श्रावण डोहळे यांना नातेवाइकांसह स्वत:साठी टीटीचे इंजेक्‍शन आणण्यासाठी औषधांच्या खासगी  दुकानात जावे लागल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

सर्वसामान्य रुग्णांसाठी जीवनदायिनी असलेल्या ग्रामीण रुग्णालयात सध्या औषधांचा तुटवडा असल्याने रुग्णांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयाच्या भांडारात औषध नसल्याने नातेवाइकांना बाहेरून औषधे आणावी लागत आहेत. तसेच विविध आजारांवर दिल्या जाणाऱ्या लसीही उपलब्ध नसल्याने खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या समस्येवर उपाययोजना होईल का? हा यक्षप्रश्‍न निर्माण झाला आहे. 

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याचा ‘ट्रेंड’; आता महाआघाडीतील या नेत्याने पाठवले स्मरणपत्र

वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील श्रावण डोहळे यांच्या दुचाकीला मंगरूळ रस्त्यावर अपघात झाला. यामध्ये ते स्वत: व त्यांची मुलगी व पत्नी जखमी झाली. प्रथमोपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. परंतु, रुग्णालयात टीटीचे इंजेक्‍शन नसल्याने अपघातात जखमी असलेले श्रावण डोहळे यांना टीटीचे इंजेक्‍शन खरेदी करायला बाहेरच्या मेडिकल स्टोअर्समध्ये जावे लागले असल्याचा प्रकार रविवारला (ता. ७) घडला. 

येथील ग्रामीण रुग्णालयात मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. तसेच बाह्यरुग्ण विभागात रुग्ण येत असतात. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून टीटीच्या लसीचा तुटवडा असल्याने बाहेरून औषधे आणावी लागत आहेत. त्यामुळे गरीब रुग्णांना त्याचा सर्वाधिक फटका बसत आहे. खासगी उपचार परवडत नसल्याने एकमेव ग्रामीण रुग्णालय आधार आहे. औषधाबाबत विचारणा केल्यास वादावादीचे प्रसंग घडतात. त्यामुळे किमान महत्त्वाच्या लसी उपलब्ध करून दिल्या जाव्यात, अशी मागणी समोर आली आहे. 

हेही वाचा - प्रकल्पग्रस्तांसाठी शासन बनले कठोर; तब्बल ५०...

टीटीच्या लसीचा पुरवठा झालेला नाही. यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाला मागणी पाठविण्यात आली आहे. 
-डॉ. महेश साबळे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, धामणगाव. 
 

loading image