उमरखेड (जि. यवतमाळ) - कर्नाटक राज्यात जाणाऱ्या एका 17 सीटर ट्रॅव्हल्सने अचानकपणे तालुक्यातील चिल्ली घाटात आज दुपारी अडीच वाजता दरम्यान पेट घेतल्याने एकच तारांबळ उडाली..दरम्यान पेट घेतल्याबरोबर प्रसंगावधान राखून ट्रॅव्हल्स चालकांनी सर्व प्रवाशांना ताबडतोब माहिती देऊन खाली उतरवले व रस्त्याच्या कडेला जाऊन उभे राहिल्याने या थरारक 'द बर्निंग ट्रॅव्हल्स' मधून पंधरा प्रवासी सुखरूप बचावले आहेत. मात्र जोपर्यंत अग्निशामक दल उमरखेडला पाचरण करण्यात आले होते तोपर्यंत ट्रॅव्हल्स ही पूर्णता: आगीत होरपळुन खाक झाली होती..कर्नाटक मधून केए 29 एन 1166 ही 17 सीटर ट्रॅव्हल्स काही दिवसाअगोदर प्रयागराज अयोध्या दर्शनासाठी रवाना झाली होती. आज दुपारी परतीला जात असताना महागाव येथे या 17 सीटर ट्रॅव्हल्स चालकाने इंधनाची टाकी ही फुल केली होती.दरम्यान महागाव येथून निघताच 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिल्ली घाटातील योगायोग ढाब्याजवळ अचानकपणे ट्रॅव्हल्सच्या समोरचा टायर हा ब्लास्ट झाला. टायर ब्लास्ट झाल्यामुळे चालकाने प्रसंगावधान राखून गाडी रस्त्याच्या कडेला घेण्याचा प्रयत्न केला असता गाडी ही रस्त्याच्या कडेवर आदळली..गाडी आदळताच त्यावेळेस समोरच्या भागातून पेट घेण्यास सुरुवात केली. मात्र चालकांनी सर्वप्रथम प्रवाशांना तातडीने उतरण्याच्या सूचना दिल्या असता त्यांचा जीव कसाबसा वाचला. परंतू गाडीने अवघ्या दोन मिनिटांच्या आतच संपूर्ण पेट घेतला.ही घटना घडली त्यावेळेस मात्र इंधनाची टाकी फुटली नसल्यामुळे तो पुढील अनर्थ हा टळला. दरम्यान रस्त्याने ये-जा करणाऱ्या पैकी शिंदे सेनेचे प्रवक्ते चितांगराव कदम यांनी तात्काळ उमरखेड नगरपरिषदच्या अग्निशमन दलाला याची माहिती दिली असता अग्निशामक दलाला पोहोचण्यासाठी काही वेळ लागला. तोपर्यंत मात्र आगीने रुद्ररूप धारण केले होते..अग्निशामन दलाचे कर्मचारी प्रयत्न करीत होते, मात्र तोपर्यंत ट्रॅव्हल्सचा पूर्ण सांगाडा झाला होता. आगीचे डोंब हवेत उडत होते, हे भयानक दृष्ट दिसत असतानाच या दुर्घटनेत मात्र जीवितहानी झाली नाही. त्यामुळे बघणाऱ्या नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.घटनेची माहिती मिळताच उमरखेड पो. स्टे. चे पिएसआय भास्कर दरणे, पोलीस कॉ. हनुमंत मुसळे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर पोलिसांनी ट्रॅव्हल्स ही आगीत जळून भस्मसात झाल्याने त्यांनी दुसऱ्या वाहनाची व्यवस्था करीत सर्व प्रवाशांना त्या वाहनात टाकून त्यांना कर्नाटक राज्याकडे रवाना केले. दरम्यान या घटनेबाबत पुढील तपास हे उमरखेड पोलीस करीत आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.