...तर इमोजी साहित्यातही दिसतील

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

नागपूर : भाषा कोणतीही असो, तिला व्याकरणाचे नियम असतातच. मात्र, इमोजी भाषेसाठी कोणतेही व्याकरणाचे नियम नाहीत. जागतिक स्तरावर झपाट्याने घोडदौड करीत असलेल्या या नवीन भाषेचा उपयोग आगामी काळात साहित्यातही होऊ शकतो. इमोजी ही अभिव्यक्त होण्यासाठी उत्तम असल्याचे मत डॉ. आशुतोष जावडेकर यांनी व्यक्‍त केले.विदर्भ साहित्य संघाच्या गणेश व्याख्यानमालेत "इमोजी व भाषा सहसंबंध, धोके व अभिव्यक्ती संधी' या विषयावर डॉ. आशुतोष जावडेकर बोलत होते. अध्यक्षस्थानी वि. सा. संघाचे कार्याध्यक्ष वामन तेलंग होते. मंचावर अरुंधती वैद्य उपस्थित होत्या. इमोजीचा जन्म जपानमध्ये झाला. त्यावेळी ही एक क्रांती समजली गेली.

नागपूर : भाषा कोणतीही असो, तिला व्याकरणाचे नियम असतातच. मात्र, इमोजी भाषेसाठी कोणतेही व्याकरणाचे नियम नाहीत. जागतिक स्तरावर झपाट्याने घोडदौड करीत असलेल्या या नवीन भाषेचा उपयोग आगामी काळात साहित्यातही होऊ शकतो. इमोजी ही अभिव्यक्त होण्यासाठी उत्तम असल्याचे मत डॉ. आशुतोष जावडेकर यांनी व्यक्‍त केले.विदर्भ साहित्य संघाच्या गणेश व्याख्यानमालेत "इमोजी व भाषा सहसंबंध, धोके व अभिव्यक्ती संधी' या विषयावर डॉ. आशुतोष जावडेकर बोलत होते. अध्यक्षस्थानी वि. सा. संघाचे कार्याध्यक्ष वामन तेलंग होते. मंचावर अरुंधती वैद्य उपस्थित होत्या. इमोजीचा जन्म जपानमध्ये झाला. त्यावेळी ही एक क्रांती समजली गेली. काळानुरूप हे चिन्ह म्हणून जगाने स्वीकारले. ऑक्‍सफोर्ड इंग्लिश डिक्‍शनरीने देखील इमोजी चिन्हाचा शब्दकोशात समावेश केल्याने त्याचे महत्त्व स्पष्ट होत असल्याचे डॉ. आशुतोष जावडेकर यांनी सांगितले. इमोजीने सामाजिक बदल घडले असून, अनेक शब्दांच्या ऐवजी एक इमोजी बरेच काही सांगत असल्याचे डॉ. जावडेकर यांनी सांगितले. प्रास्ताविक डॉ. अरुंधती वैद्य यांनी केले. संचालन नितीन शहस्त्रबुद्धे यांनी केले. इमोजी ही चित्रमय भाषा असल्याने परिणामकारक ठरते. त्यामुळे संवेदशनशील किशोरवयीन व तरुणांमध्ये इमोजीची लोकप्रियता अधिक आहे. जगभरातील प्रत्येक भाषेसाठी हे नव व्यंजन ठरले असून, पुढेही जग इमोजीचे स्वागतच करणार असल्याचा विश्‍वास डॉ. आशुतोष जावडेकर यांनी व्यक्‍त केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: .. then emoji will appear in the literature as well