इथं मरणानंतरही होतात हाल...

संजय जाधव
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

ही तर लाजीरवाणी गोष्ट...
आजोबांचे वयाच्या 87व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जागा मिळेना. अंत्यसंस्कारासाठी जाताना गुडघाभर पाणी, चिखलातून जावे लागले. गावाला स्मशानभूमी नसणे, ही लाजीरवाणी गोष्ट आहे. संबंधितांनी याकडे लक्ष द्यावे आणि गावाला लवकर स्मशानभूमी बांधून दिली.
- प्रशांत उंबरकर, गावकरी

बुलडाणा : देश डिजिटल जगाकडे निघाला असताना राज्यातील काही गावे अशी आहेत, जिथे साधा रस्ता तर नाहीच पण, मरणानंतरही मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी साधी स्मशानभूमीही नाही. अशी स्थिती मलकापूर तालुक्यातील उमाळी गावाची आहे. विशेष म्हणजे हे गाव आमदारांनी दत्तक घेतलेले आहे.

गावातील उमाळी येथील वासुदेव रामभाऊ उंबरकर यांचे बुधवारी (दि. 28) वयाच्या 82व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा गुडघाभर साचलेल्या पाण्यातून काढावी लागली. अंत्ययात्रेत सहभागी असलेल्या लोकांच्या मुखातून 'राम बोलो भाई राम' ऐवजी तीव्र संताप व्यक्त होत होता. मृतदेहाचा अंत्यविधी उघड्यावरच करण्यात आला. त्यावेळी अचानक पाऊस आल्याने तारांबळ उडाली.

बाकीची विकासकामे होतील तेव्हा होतील पण, निदान मृत्यूनंतर तरी शांतपणे जळण्यासाठी, ऊन, वाऱ्यापासून संरक्षण होण्यासाठी स्मशानभूमी बांधावी, अशी मागणी गावकरी करत आहेत.

ही तर लाजीरवाणी गोष्ट...
आजोबांचे वयाच्या 87व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जागा मिळेना. अंत्यसंस्कारासाठी जाताना गुडघाभर पाणी, चिखलातून जावे लागले. गावाला स्मशानभूमी नसणे, ही लाजीरवाणी गोष्ट आहे. संबंधितांनी याकडे लक्ष द्यावे आणि गावाला लवकर स्मशानभूमी बांधून दिली.
- प्रशांत उंबरकर, गावकरी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is no cemetery in Umali Village