ऐकावे ते नवलच! उपवासाने झाले त्यांचे आजार दूर

navandar.
navandar.

मांजरखेड कसबा (जि. अमरावती) ः आजच्या एकविसाव्या शतकात जर कोणी फळ, कंदमूळ खाऊन स्वतःसह कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करीत असेल तर तुम्ही त्यांना एकतर आदिम समजाल किंवा वेड्यात काढाल, आणि याच जीवनशैलीद्वारे एखाद्याने मधुमेह, रक्तदाबासारख्या आजारावर मात केली असं म्हटलं तर कोणाचाच विश्‍वास बसणार नाही. परंतु हे सर्व शक्‍य झाले आहे.

अंजनगावबारी येथील होमिओपॅथ डॉ. कमलकिशोर नावंदर यांनी दृढनिश्‍चयाने स्वतःवर ट्रायल करून शरीरात ठाण मांडलेल्या आजारांना उपवासाचा पाहूणचार देऊन कायमचा "अलविदा' केला आहे.

निसर्गातील विविध पशू-पक्षी, प्राणी लाखो वर्षांपासून कंदमुळं खाऊन आपले उदरभरण करीत आहेत, ते कधी आजारी पडल्याचे ऐकिवात नाही. तेच पाळीव प्राणी मात्र मानवीय आहारामुळे आजारी पडतात, हाच धागा घेऊन डॉ. नावंदर यांनी आपल्या जीवनशैलीत बदल केला. याकरिता त्यांनी अमेरिका व इतर देशांसह भारतातील प्रख्यात आहारतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतले.

डॉ. नावंदर दाम्पत्याला रक्तदाब व मधुमेहाचा आजार होता. काही होमिओपॅथी औषध व योग्य आहारामुळे आज दोघेही रोगमुक्त झाले असून पांढरे झालेले केसही काळे होत असल्याचा अनुभव त्यांना येत आहे. नैसर्गिक आहारातून मूळव्याध, थायरॉईड, रक्तदाब, मधुमेह, मायग्रेन सारख्या आजारापासून कायमची सुटका होत असल्याने इतरांनाही याचा लाभ मिळावा म्हणून डॉ. नावंदर सर्वांना मोफत मार्गदर्शन करीत आहेत.

सिजनल, रिजनल, ओरिजनल
सकाळी हिरव्या पालेभाज्यांचा ज्यूस, दुपारी व सायंकाळी फळांचा ज्यूस, भिजलेले कडधान्य आणि सलाद यापद्धतीने गत सहा महिने त्यांनी आपला आहार ठेवला आहे. या काळात गॅसवर शिजवलेले कुठलेही अन्न त्यांनी खाल्लेलं नाही. पालेभाजीमध्ये पालक, शेवग्याची पाने, तुळशी, चिंच, पदिना, कोथिंबीर, बेल, पेरू इत्यादी वनस्पतींचा समावेश असतो, तर फलाहारात महाग फळांऐवजी सिजनल, रिजनल व ओरिजनल फळे सेवन करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

उपवासाचे रहस्य
आपणास जेवणातून नव्हे तर पुरेशा झोपेतून व प्राणायामातून ऊर्जा प्राप्त होते. उपवासामुळे शरीराचे शुद्धीकरण होते. यापूर्वीही त्यांनी 100 दिवस, 40 दिवस केवळ फलाहारावर काढलेले आहेत. आज त्यांचा सहा महिन्यांचा उपवास पूर्ण झाला.

संपादन - स्वाती हुद्दार
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com