प्रस्ताव मंजुरीसाठी त्यांनी मागितली चिरीमिरी,अलगद अडकले पोलिसांच्या जाळ्यात!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

 स्वयंचलित धान कापणी यंत्राचा प्रस्ताव मंजूर करण्याकरिता तक्रारदाराकडून 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई गुरुवारी ( ता. 21) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

गोंदिया : भ्रष्टाचाराची समाजाला लागलेली कीड जाता जात नाही. लहानांपासून मोठ्या पदांपर्यंत लाच घेण्याचे प्रकार चालूच आहेत. शेती संबंधित व्यवसायातही भ्रष्टाचाराची पाळेमुळे आहेतच.
 स्वयंचलित धान कापणी यंत्राचा प्रस्ताव मंजूर करण्याकरिता तक्रारदाराकडून 15 हजार रुपयांची लाच स्वीकारताना दोघांना अटक करण्यात आली. ही कारवाई गुरुवारी ( ता. 21) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
वैभव मुंगले ( संगणक रुपरेषक) कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन कारंजा व रविकांत सुखराम रावते ( सेल्समन) मॉडेल ऑटोमोबाईल, फुलचुर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
यातील तक्रारदार हे कृषिन्नोती धान उत्पादन शेतकरी गटाचे अध्यक्ष आहेत. हा गट कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापनांतर्गत नोंदणीकृत आहे. गटामार्फत शासनाकडून स्वयंचलित धान कापणी यंत्र खरेदी करण्याचा ठराव संमत करण्यात आला होता.

सविस्तर वाचा - कोरोना तपासणीत हयगयीला जबाबदार कोण? उच्च न्यायालयाची विचारणा

हा प्रस्ताव या कार्यालयाला सादर करण्यात आला होता. त्यानंतर प्रस्ताव मंजूर करण्यासाठी मुंगले याने 20 हजार रुपये लाच मागितली.  रक्कम मॉडेल ऑटोमोबाईलमध्ये स्वीकारताना रावते याला अटक करण्यात आली. त्याने मुंगलेच्या सांगण्यावरून ही रक्कम स्वीकारली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: They asked bribe for sanction of proposal