चोराला पकडून दिले पोलिसांच्या ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 ऑगस्ट 2019

राळेगाव (जि. यवतमाळ) : रात्री दहाच्या सुमारास घरात चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोराला नागरिकांनी पकडून चोप दिला व शेवटी पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना शहरातील बहाळे ले-आऊटमध्ये मंगळवारी रात्री घडली.

येथील बहाळे ले-आऊटमधील शिक्षक अरुण कामनापुरे रात्री घराचे गेट लावण्यासाठी बाहेर आले असता त्यांना दरवाज्याआड कोणीतरी लपून असल्याचे दिसले. त्यांनी आवाज दिला असता चोरटा गेटवरून उडी मारून पळाला. कामनापुरे यांनी त्याचा पाठलाग करून त्याला सायकलवरून खाली पाडले व पकडून ठेवले. "चोर चोर' अशी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिकही जमा झाले. त्यांनीही चोराला चांगला चोप दिला. चोर दारू पिऊन होता. त्याच्याजवळ दारूची बाटलीही होती. नागरिकांनी कळंब पोलिस ठाण्याला कळविल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन चोराला घेऊन गेले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The thief was arrested and taken into police custody