वर्धा - सावंगी पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात सुकळी (बाई) येथील बॅंक ऑफ इंडियाच्या शाखेची भिंत तोडून चोरीचा प्रयत्न चोरट्यांनी केल्याचे सोमवारी (ता. २) सकाळी उजेडात आले आहे. वर्धा शहर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात दोन ठिकाणी चैन स्नॅचरांनी महिलांना टार्गेट केले. ही घटना ताजी असतानाच आता सुकळीची घटना घडली. चोरट्यांचा हा मनमर्जीचा सपाटा पोलिसांसाठी खुले आव्हान ठरत आहे.