
या घटनेची तक्रार वरोरा पोलिस ठाण्यात करण्यात आली. पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. शहरातील दोंदेनगर आणि फुकटनगरातसुद्धा यापूर्वी घरफोडीच्या घटना घडल्या आहेत.
वरोरा (जि. चंद्रपूर): घरी कुणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी घरातील एक लाख 85 हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले. ही घटना शहरातील आंबेकर ले-आउट परिसरातील ऋषी मडावी यांच्या घरी घडली. मागील काही दिवसांतील ही तिसरी घटना असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, चोरट्यांना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.
हेही वाचा - भयंकर प्रकार! मेडिकलच्या ट्रॉमात रात्री कुत्र्यांचा मुक्त वावर; २००७ मध्ये कुरतडले होते बाळ
करंजी मार्गावरील आंबेकर ले-आउट येथे ऋषी मडावी हे कुटुंबीयांसह राहतात. कामानिमित्त ते कुटुंबीयांसह समुद्रपूर येथे सासुरवाडीला गेले होते. घरी कुणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी मडावी यांच्या घराचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आलमारीतील सुमारे एक लाख 85 हजार रुपये किमतीचे सोने, चांदीचे दागिने लंपास केले. मडावी हे कुटुंबीयांसह घरी परतल्यानंतर चोरीची घटना उघडकीस आली.
या घटनेची तक्रार वरोरा पोलिस ठाण्यात करण्यात आली. पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. शहरातील दोंदेनगर आणि फुकटनगरातसुद्धा यापूर्वी घरफोडीच्या घटना घडल्या आहेत.
नक्की वाचा - ब्रेकिंग: उपराजधानीतील अंबाझरी जैवविविधता उद्यानात भीषण आग; अग्निशमन विभागाचे एकूण ७...
दिवसाढवळ्या घरफोडीच्या घटना घडत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी चोरीच्या घटनांवर अंकुश घालून चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्या, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
संपादन - अथर्व महांकाळ