थोरातांचा दावा, आघाडीच्या आमदारांची संख्या होणार दुप्पट 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

नागपूर : भाजप जाहिरातींच्या माध्यमातून पाच वर्षांत दुप्पट-तिप्पट विकास केल्याचा दावा करीत असली तरी राज्यातील परिस्थिती विपरीत आहे. यंदा कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या आमदारांची संख्या दुप्पट होणार असल्याचा दावा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत केला. 

नागपूर : भाजप जाहिरातींच्या माध्यमातून पाच वर्षांत दुप्पट-तिप्पट विकास केल्याचा दावा करीत असली तरी राज्यातील परिस्थिती विपरीत आहे. यंदा कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या आमदारांची संख्या दुप्पट होणार असल्याचा दावा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत केला. 
सध्या आघाडीचे नेते राज्यभर प्रचार करीत आहेत. प्रत्येक ठिकाणी कॉंग्रेस आघाडीच्या सभांना भरघोस प्रतिसाद मिळत आहे. पूर परिस्थितीमुळे पश्‍चिम महाराष्ट्राची परिस्थिती बदलली आहे. कोणीच मदत केली नसल्याने भाजपच्या विरोधात येथे असंतोष आहे. विदर्भ-मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. उद्योग बंद पडत असल्याने मुंबईतही सरकारच्या विरोधात नाराजी दिसून येते. त्यावरून विधानसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा आघाडीला मतदान करतील असाही विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 
पाच वर्षांत राज्यात काहीच केले नसल्याने भाजपतर्फे पुलवामा, 370 कलमाचे मुद्दे काढून जनतेची दिशाभूल केली जात आहे. लोकसभेत त्यांचा प्रयोग यशस्वी झाला. मात्र, विधानसभा आणि लोकसभेचे मुद्दे वेगवेगळे असतात. विधानसभा सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांवर लढविली जाते. आम्ही जनतेच्या हिताचेच मुद्दे घेऊन लोकांसमोर जात आहोत, असेही थोरात यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला कॉंग्रेसचे प्रवक्‍ते आशीष दुवा, अतुल लोंढे आदी उपस्थित होते. 
पाच वर्षांत काय केले : खरगे 
पाच वर्षांत शेतकऱ्यांच्या आत्म
हत्या थांबल्या नाहीत, रोजगारही मिळाला नाही आणि सिंचन क्षेत्रातही वाढ झालेली नाही. पन्नास वर्षे आम्ही काय केले, अशी विचारणा आम्हाला भाजपचे नेते वारंवार करीत आहेत, आता त्यांनी पाच वर्षांत काय केले हे आधी सांगावे, अशी मागणी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी केली. महाराष्ट्रातील रोजगार घटले, कृषी विकास दरही घटले आहेत. हे आमचे म्हणणे नाही. नॅशनल सॅंपल सर्व्हेची आकडेवारी आहे, याकडेही खरगे यांनी लक्ष वेधले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thorata sayas, the number of leading MLAs will double