शहरातील एक हजार खड्डे बुजविले 

file photo
file photo

नागपूर :  उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर शहरातील खड्ड्यांबाबत मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यामुळे त्यांनी सर्वत्र खड्डे बुजविण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू केले आहेत. 20 सप्टेंबर ते 3 ऑक्‍टोबर या कालावधीमध्ये मनपाच्या हॉट मिक्‍स विभागाने दहाही झोनमधील 1031 खड्डे बुजविले आहेत. 
सप्टेंबर महिन्यापासून आतापर्यंत 21 हजार 951 वर्ग मीटर रस्ता दुरुस्त करण्यात आला आहे. एक एप्रिलपासून शहरातील खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले. एक एप्रिल ते 19 सप्टेंबरपर्यंत 2 लाख 9 हजार 776 वर्ग मीटर जागेतील 6728 खड्डे बुजविण्यात आले. आतापर्यंत एकूण 7659 खड्डे बुजविण्यात आले आहेत. एक ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये जेट पॅचर मशीनद्वारे विविध भागांतील 4715 वर्ग मीटर रस्त्यातील 319 खड्डे बुजविले आहेत. 
खड्ड्यांच्या समस्यांबाबत नागरिकांच्या वाढत्या तक्रारी आणि सुरक्षेच्या दृष्टीने मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. यासंबंधी 24 सप्टेंबरला सर्व उपअभियंता, कार्यकारी अभियंता व कनिष्ठ अभियंता यांची बैठक घेऊन खड्डे बुजविण्याच्या कार्याला प्राधान्य दिले. यानंतर शहरात सर्वत्र रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कार्याला वेग आला. 
मनपा आयुक्तांच्या शिफारशीवरून नागपूर सुधार प्रन्यासने हॉट मिक्‍स प्लांट सुरू केला आहे. या प्लांटच्या माध्यमातून नेहरूनगर, आसीनगर, लकडगंज या तीन झोनमधील खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले. यासाठी मनपातर्फे नागपूर सुधार प्रन्यासला 25 लाख रुपये आगाऊ रक्कम देण्यात आली. नागपूर सुधार प्रन्यासद्वारे करण्यात आलेले काम पाहता उर्वरित सात झोनमधील रस्त्यांचे खड्डेही नासुप्रच्या सहकार्याने बुजविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनपा आयुक्तांनी महा मेट्रो, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागीय, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण या विभागांनाही त्यांच्या कार्यक्षेत्रात येणारे खड्डे युद्धपातळीवर दुरुस्त करण्याचे आवाहन मनपा आयुक्तांतर्फे करण्यात आले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com