Margshirsha Guruvar Vrat : पहिल्या गुरुवारी शेगावात भक्तांची मांदियाळी ....मार्गशीर्ष महिना; भाविकांकडून विजय ग्रंथाचे पारायण
Margashirsha month : मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी शेगावच्या श्री संत गजानन महाराज मंदिरात हजारो भाविकांचा उत्साही दरबार पाहायला मिळाला. भक्तांनी विजय ग्रंथाचे पारायण करून श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला.
शेगाव : धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जाणारा मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी मार्गशीर्ष शु ४ रोजी श्री संत गजानन महाराज मंदिरात श्रींच्या दर्शनासाठी शेगाव येथे भाविक भक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली.