
उमरखेड : गावातील दारू बंद करा. तुम्हाला हप्ते पाहिजे असेल तर सांगा.आम्ही देतो.पण गावातील दारू बंद करा. तुमच्याने दारू बंद होत नसेल तर आम्ही तुमचा मर्डर करतो. या आशयाच्या चिठ्ठ्या सरपंच आणि पोलिस पाटलांना उद्देशून जागोजागी लावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. तालुक्यातील देवसरी गावात हा प्रकार उजेडात आला आहे.