
पातूर : नायब तहसीलदार बळीराम चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी देत शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करणाऱ्या प्रकरणात पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी, प्रहार जनशक्ती पक्षाचा कार्यकर्ता अरविंद पाटील वानखडे याला आज (३ मे) रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर पातूर पोलिसांनी अटक केली. तर वाळू माफिया सचिन निमकाळे याचा अटकपूर्व जामीन अर्ज सत्र न्यायालयाने २ मे रोजी फेटाळला.