वाहन उलटून तिघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

नांद - स्वागत समारंभ आटोपून गावी परतणाऱ्या वऱ्हाड्यांचे वाहन उलटून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर २५ जण जखमी झाले. ही घटना भिवापूर तालुक्‍यातील नांद-पांजरापार मार्गवर शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. राजकुमार रामटेके (वय ४५) व अशोक खोब्रागडे (वय ४५, दोन्ही रा. भिसी) असे मृतांची नावे आहेत. तर एकाचा उपचारादरम्यान रविवारी सायंकाळी मृत्यू झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार, चिमूर तालुक्‍यातील भिसी येथील ईश्‍वर बन्सोड यांच्याकडील वऱ्हाडी हिंगणघाट दारोडा येथे लग्नानंतर स्वागत समारंभासाठी मालवाहू गाडीने गेले होते. समारंभ आटोपून परतताना पांजरापार शिवारात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ती उलटली. यात दोघांचा मृत्यू झाला तर अन्य २५ जखमी झाले. नांद पोलिसांनी गंभीर जखमींना नागपूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालय व उमरेड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. जखमींमध्ये विष्णू ढाक, राजकुमार इंगोले, रुतिक इंगोले, तुळशीदास पेलणे, करण पेलणे, कुंडलिक मुळे, तुळशीदास बन्सोड, सूरज इंगळे, संदीप बसेशंकर, आकाश इंगोले, ईश्वर बन्सोड, सुभाष बन्सोड, सीताराम भुजबळ, वैभव  बसेशंकर, रोशन बसेशंकर, अजय नवले, गोविंदा नवले, दिलीप बसेशंकर, दामोधर बसेशंकर, नामदेव ढाक यांचा समावेश आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three death in accident