
दिलीप इंगोले (वय 65 वर्ष ), दीपक चैतराम मुंजेवार(वय 43 वर्ष) आणि सुरेखा दिलीप इंगोले (वय 58 वर्ष), अशी मृतकांची नाव आहेत. मृतक आणि जखमी नागपूरच्या हिंगणा परिसरातील रहिवासी असून ते कारने नागपूरला जात होते.
वर्धा : भरधाव कार रस्ताच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळून अपघात झाला. यामध्ये तीन जण जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाले. पुलगाव ते वर्धा मार्गावरील मलकापूर-केळापूर शिवारात सोमवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघाता ठार झालेले चालक महिलेचे आई-वडील आणि पती असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा - मुख्यमंत्र्यांनी स्तुती केलेला ‘राजकुमार’ आहे तरी कोण? त्याचा उपवास होता म्हणून बरं झाल असं का...
दिलीप इंगोले (वय 65 वर्ष ), दीपक चैतराम मुंजेवार(वय 43 वर्ष) आणि सुरेखा दिलीप इंगोले (वय 58 वर्ष), अशी मृतकांची नाव आहेत. मृतक आणि जखमी नागपूरच्या हिंगणा परिसरातील रहिवासी असून ते कारने नागपूरला जात होते. रस्त्यात डिझेल संपल्याने ट्रक रस्त्याच्या कडेला उभा ठेवला होता. हेमंती दीपक मुंजेवार ही महिला कार चालवित होती. त्यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने ट्रकला मागून धडक दिली. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला, तर चालक हेमंती या गंभीर जखमी असून दोन मुले सुरक्षित आहेत. घटनेची माहिती मिळताच, पुलगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठत जखमी आणि मृतांना पुलगाव येथील रुग्णालायत दाखल केले. जखमीला पुढील उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले, तर मृतकांचे पुलगाव येथील रुग्णालयात शविच्छेदन करण्यात आले. उभ्या ट्रकला कारने मागून दिलेली धडक इतकी भीषण होती की कारचा चुराडा झाला. याप्रकरणी पुलगाव पोलिसांनी नोंद केली.