जात होते डॉक्टरकडे, वाटेत कर्दनकाळ ठरला ट्रक.. 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

भाकर काळबेंडे यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते वरुड येथून मुलगा, नातू व पत्नीसह तपासणीकरिता एमएच 27 बीझेड 0706 क्रमांकाच्या कारने वरुडहून अमरावतीला येत होते. घटनेच्या काही वेळेपासून माहुली ठाण्यासमोर असलेल्या छोट्या पुलावर रस्त्याच्या कडेला एमएच 27 एफ 9299 क्रमांकाचा ट्रॅक्‍टर, ट्रॉलीसह उभा होता. तेवढ्यात मोर्शी मार्गाने येणारी कार ट्रॉलीवर मागील बाजूने धडकली.

अमरावती  : अमरावती ते मोर्शी मार्गावर माहुली जहॉंगीर पोलिस ठाण्यासमोर भीषण अपघातात एकाच कुटुंबातील निवृत्त शिक्षक दाम्पत्यासह त्यांचा मुलगा असे तिघे जण जागीच ठार झाले. तर, चिमुकला धक्‍क्‍यामुळे बाहेर फेकल्या गेल्यामुळे बचावला. 

सोमेश प्रभाकर काळबेंडे (वय 26), प्रभाकर रामचंद्र काळबेंडे (वय 74) व राजमती प्रभाकर काळबेंडे (वय 62 तिघेही रा. वरुड) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. तर, श्री. काळबेंडे यांचा नातू, धडक बसल्यावर बाहेर फेकल्या गेल्यामुळे बचावला. वरद सुरेंद्र दोंदळकर (वय 8 रा. वरुड) असे जखमी चिमुकल्याचे नाव आहे. वरद हा श्री. काळबेंडे यांच्या मुलीचा मुलगा असून, आजोबांकडे वरुड येथे शिकायला आहे. असे निकटवर्तीयांनी सांगितले. 

एकाच कुटुंबातील तीन ठार 
भाकर काळबेंडे यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते वरुड येथून मुलगा, नातू व पत्नीसह तपासणीकरिता एमएच 27 बीझेड 0706 क्रमांकाच्या कारने वरुडहून अमरावतीला येत होते. घटनेच्या काही वेळेपासून माहुली ठाण्यासमोर असलेल्या छोट्या पुलावर रस्त्याच्या कडेला एमएच 27 एफ 9299 क्रमांकाचा ट्रॅक्‍टर, ट्रॉलीसह उभा होता. तेवढ्यात मोर्शी मार्गाने येणारी कार ट्रॉलीवर मागील बाजूने धडकली.

शेतकऱ्यांचा सातबारा होणार कोरा, फक्‍त व्याजाची आकारणी करू नका 

कारचा बराच भाग ट्रॉलीच्या आतमध्ये घुसून चकनाचूर झाला. त्यात पती, पत्नीसह मुलगा असे तिघे जागीच ठार झाले. चिमुकला नातू वरद हा अपघातातून बचावला. जखमी नातवास माहुली पोलिसांनी उपचारासाठी अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. त्याला पुढील उपचाराकरिता खासगी रुग्णालयात हलविले. प्रकरणी माहुली जहॉंगीर पोलिसांनी उभ्या असलेल्या ट्रॅक्‍टरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केली होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three died in major car accident amravati