Pratiksha Chaudhary, Akshara Chaudhary and radhya Chaudhary
Pratiksha Chaudhary, Akshara Chaudhary and radhya Chaudharysakal

Aarni News : पैनगंगा नदीत तिघींचा बुडून मृत्यू; आईसमोरच बुडाल्या मुली, पुतण्यांसह काकूचा समावेश

पाय घसरून दोन मुलींसह काकूचा पैनगंगा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.

आर्णी (जि. यवतमाळ) - तालुक्यातील कवठा बाजार येथील चौधरी कुटुंबातील महिला शनिवारी (ता.१३) सायंकाळी पाचच्या सुमारास पैनगंगा नदीपात्रात बेलफूल वाहण्यासाठी गेले होते.

यावेळी पाय घसरून दोन मुलींसह काकूचा पैनगंगा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. प्रतीक्षा प्रवीण चौधरी (वय३५) असे या घटनेत मृत्यू झालेल्या काकूचा तर अक्षरा नीलेश चौधरी (वय११) व आराध्या नीलेश चौधरी (वय९) असे मृत पुतण्यांचे नावे आहेत. आईच्या समोरच मुली बुडाल्या परंतु, आई काहीच करू शकली नाही.

पैनगंगा नदी पात्रात बेलफूल वाहण्यासाठी प्रतीक्षा प्रवीण चौधरी, जया नीलेश चौधरी, रेणू नीलेश चौधरी, अक्षरा नीलेश चौधरी, आराध्या नीलेश चौधरी असे चौधरी कुटुंबीय गेले होते. परंतु, पैनगंगा नदी पात्रात वाळू उपसा केल्याने मोठाले खड्डेच खड्डे पडले आहे. नदीला भरपूर पाणी असल्याने व वाळू उपसा झालेल्या खड्ड्यात पाणी साचून असल्याने नदीपात्राच्या काठावर खड्डा आहे, हे लक्षातच आले नाही.

त्यामुळे पाय घसरल्याने या खड्ड्यात काकू प्रतीक्षा, पुतण्या अक्षरा, आराध्या ह्या पडल्याने आई जया नीलेश चौधरी व मोठी बहीण रेणू नीलेश चौधरी ह्या तिघींना पाण्यातून बुडताना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, प्रयत्न अयशस्वी झाला आणि ह्या तिघी बुडाल्या. आई जया व बहीण रेणू यांनी यावेळी एकच आक्रोश केला.

ही माहिती गावात पसरताच नातेवाइकांसह ग्रामस्थांनी नदीकडे धाव घेतली. पोलिसांनाही माहिती देण्यात आली. तिघींनाही पाण्यातून काढण्यात आले, परंतु, त्यांचे मृतदेहच हाती लागले. ठाणेदार केशव ठाकरे पोलिस उपनिरिक्षक स्वाती वानखडे, जमादार सतीश चौधार, अशोक टेकाळे, नफीस शेख, विशाल गावंडे आदी घटनास्थळी दाखल झाले.

वाळूच्या खड्ड्यांमुळे गेला जीव

नदीत वाळू माफियांनी खोदलेल्या खड्ड्यांमुळेच ह्या तिघींना जीव गेला असा आरोप करून संतप्त नातेवाइकांसह ग्रामस्थांनी आर्णिचे तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यावर कारवाईची मागणी केली. जो पर्यंत तहसीलदार, मंडळअधिकारी, तलाठी, घटनास्थळावर येणार नाही तो पर्यंत मृतदेहांना हात लावू देणार नाही, अशी संतप्त भूमिका ग्रामस्थांनी घेतली. वृत्त लिहिपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com