esakal | मनात राग घेऊन त्या ‘तिघी’नी धरली होती मुंबईची वाट!
sakal

बोलून बातमी शोधा

Three girls from the same village were fleeing

एकाच गावातील आणि एकाच वर्गात शिकणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींनी घरच्यांचा राग मनात धरत घर सोडले. ऐवढेच नव्हे तर चक्क मुंबईला जाण्याचा बेतही आखला. मात्र, या तिन्ही अल्पवयीन मुलींना अकोला रेल्वे स्थानकांवरून रेल्वे पोलिसांनी विश्‍वासात घेऊन विचारपूस करीत त्या मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. ही कौतुकास्पद कारवाई अकोला रेल्वे पोलिसांनी मंगळवारी (ता.3) केली.

मनात राग घेऊन त्या ‘तिघी’नी धरली होती मुंबईची वाट!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : एकाच गावातील आणि एकाच वर्गात शिकणाऱ्या तीन अल्पवयीन मुलींनी घरच्यांचा राग मनात धरत घर सोडले. ऐवढेच नव्हे तर चक्क मुंबईला जाण्याचा बेतही आखला. मात्र, या तिन्ही अल्पवयीन मुलींना अकोला रेल्वे स्थानकांवरून रेल्वे पोलिसांनी विश्‍वासात घेऊन विचारपूस करीत त्या मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. ही कौतुकास्पद कारवाई अकोला रेल्वे पोलिसांनी मंगळवारी (ता.3) केली.  


अकोला जिल्ह्यात एकीकडे मुली बेपत्ता होण्याच्या प्रमाणात वाढ होऊन अकोल्यातील पोलिसांवर चांगलेच तोंड सुख घेण्यात येत आहे. तर याच वाढत्या घटनेमुळे अकोल्यातील पोलिस अधीक्षक यांची बदलीसुद्धा करण्यात आली आहे. पण अकोल्यातील रेल्वे पोलिसांनी रागाच्या भरात धरून निघून आलेल्या तीन अल्पवयीन मुलींना त्यांचा पालकांच्या स्वाधीन करून माणुसकीचा परिचय दिला .
वाशीम येथील तीन अल्पवयीन मुली रागाच्या भरात घरातून बाहेर पडल्या. मुंबईला जाण्यासाठी त्या रेल्वेने अकोला रेल्वे स्थानकावर आल्या.  दरम्यान रेल्वे स्थानकांवर ऑपरेशन मुस्कान अंतर्गत चौकशी करताना या मुली पोलिसांच्या हाती लागल्या.  घरातील किरकोळ कारणांवरून या तिन्ही मुली घराच्या बाहेर पडल्या. दरम्यान, मंगळवारी सकाळी या मुली रेल्वेने अकोला रेल्वे स्थानकावर आल्या. दरम्यान, जीआरपी पोलिस रेल्वे स्थानक परिसरात पेट्रोलिंग करीत असताना ऑपरेशन मुस्कान अंतर्गत चौकशी करतांना या मुली संशयास्पद दिसून आल्या. दरम्यान, रागाच्या भरात मुली घरातून बाहेर पडल्या असल्याच पोलिसांनी सांगिलते आहे. अल्पवयीन मुलींना बाल कल्याण समितीकडे हजर करणार असून, त्यानंतर मुलींना पालकांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.