Drone Shoot : ड्रोनची भरारी ठरणार बेकायदेशीर

स्वदेशी बनावटीसह तीन परवाने आवश्यक
Three licenses required for drone shooting
Three licenses required for drone shooting

पथ्रोट (अमरावती) : सण, उत्सव, धार्मिक मिरवणूक, विवाह व इतर खासगी कार्यक्रमात वापरण्यात येत असलेल्या ड्रोन कॅमेऱ्याची भरारी आता बेकायदेशीर ठरणार आहे. यासाठी स्वदेशी बनावटीच्या ड्रोनसह तीन प्रकारच्या परवान्यांची आवश्यकता निश्चित करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये कॅमेरा मालकाचा परवाना, उडविणाऱ्याचा परवाना (पायलट) तसेच ड्रोन कंपनीचा परवाना यांचा समावेश आहे. या नियमांचे उल्लंघन झाल्यास किंवा कुणाची तक्रार आल्यास पोलिस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

शासनाने ठरवून दिलेल्या भागातूनच ड्रोन उडविता येते. कुणाच्या खासगी मालमत्तेवरून ड्रोन उडविले जाऊ शकत नाही. शासनाचे तसे निर्देश आहेत. ड्रोन कॅमेऱ्याने व्हिडिओ शूटिंग वा फोटोग्राफी करण्याचा ‘ट्रेंड’ आला असताना त्यासाठी आवश्यक परवानगीकडे दुर्लक्ष होत आहे.

सध्या वापरण्यात येत असलेले चिनी कंपनीचे ड्रोन केंद्र सरकारने पूर्णतः प्रतिबंधित केले आहेत. सण, उत्सव, धार्मिक रॅली, खासगी कार्यक्रमांप्रसंगी ड्रोनद्वारे शूटिंग करताना नागरी विमान वाहतूक मंत्रालयाची परवानगी आवश्यक आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक किंवा पोलिस आयुक्त अशा मोठ्या हुद्द्यावरील अधिकारी काही घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोन उडविण्यास परवानगी देऊ शकतात.

सध्या तरी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाव्यतिरिक्त इतर विभागांवर यासंबंधी कारवाई करण्याबाबत निश्चित करण्याचे निर्देश आले नाहीत. असे असले तरी खासगीरीत्या ड्रोनला परवानगी नाहीच. याबाबत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन घेणे सुरू आहे, अशी माहिती पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

या आहेत अटी

डीजीसीएकडून ड्रोनला परवानगी मिळते. यामध्ये संबंधित व्यक्ती १८ वर्षे वयाची व दहावी पास असावा, अशी अट आहे. ११ फेब्रुवारी २०२२, २५ ऑगस्ट २०२१ व २७ ऑगस्ट २०१८ च्या भारत राजपत्रामध्ये या माहितीचा तपशील आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com