Gadchiroli Crime : तिघांच्या हत्येने उडाली खळबळ; दोघांसह एका बालिकेची हत्या

येमली बुर्गी पोलिस मदत केंद्राअंतर्गत गुंडापूरी गावात दोघांसह एका बालिकेची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.
murder
murderesakal
Updated on

गडचिरोली - येमली बुर्गी पोलिस मदत केंद्राअंतर्गत गुंडापूरी गावात दोघांसह एका बालिकेची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.

पिपली बुर्गी पोलिस मदत केंद्राअंतर्गत गुंडापुरी गावात देउ दसरू कुमोटी (वय ६०), बिच्छे देउ कुमोटी (वय ५५) व अर्चना रमेश तलांडी (वय १०) या तिघांचे मृतदेह त्यांच्याच शेतात आढळून आले. सध्या धानाची कापणी सुरू असून या कामासाठी हे तिघेही शेतात राहत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिकदृष्ट्या ही हत्या कठोर आणि बोथट वस्तूने झाली आहे. त्यांचे मृतदेह येमली बुर्गी पोलिस मदत केंद्रात आणण्यात आले असून, उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या हत्येतील माओवाद्यांचा कोणताही सहभाग समोर आलेला नसून हत्येचे कारण नातेवाईकांमधील वाद असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पुढील तपास गडचिरोली पोलिस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com