Tiger Attack : नरभक्षी वाघासोबतच जगायचे का? सहा महिन्यात तीन बळी; ग्रामस्थांच्या जिवाची किंमत मात्र कवडीमोल
Wildlife : पारशिवनी तालुक्यातील जंगलालगतच्या गावात वाघाने पुन्हा एकदा हल्ला करून शेतकऱ्याचा जीव घेतला. वन्यप्राण्यांच्या रक्षणाच्या नावाखाली मानवी जीव धोक्यात येत असल्याची गंभीर बाब पुन्हा अधोरेखित झाली आहे.
पारशिवशी : पारशिवनी हा जंगलव्याप्त तालुका असून या जंगलव्याप्त भागात अनेक लहानमोठी गावखेडी आहेत. आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात वास्तवाला आहे. त्यातच हिंस्त्र पशुंचा सदोदित वावर.