esakal | गोंदिया : वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नीवर दुःखाचा डोंगर
sakal

बोलून बातमी शोधा

गोंदिया : वाघाच्या हल्ल्यात पतीचा मृत्यू; पत्नीवर दुःखाचा डोंगर

गोंदिया : वाघाच्या हल्ल्यात पतीचा मृत्यू; पत्नीवर दुःखाचा डोंगर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गोरेगाव (जि. गोंदिया) : वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय गोरेगावअंतर्गत येणाऱ्या भडंगा ते पिंडकेपार मार्गालगत असलेल्या जंगलात वाघाने हल्ला केल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी घडली. पूना मोहन मेश्राम (वय ६०, रा. भडंगा) असे मृताचे नाव आहे. (Tiger-Attack-Man- killed-Gondia-Tiger-News-Crime-News-nad86)

पूना मेश्राम हे भडंगा-पिडकेपार जंगल परिसरात शेळ्यांसाठी झाड्यांच्या फांद्या आणण्यासाठी गेले होते. यावेळी जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पूना मेश्राम पत्नीसोबत दोघेच राहत होते. उदरनिर्वाह करण्यासाठी शेळी पालन करीत होते. शेळ्यांसाठी जंगलात फांद्या आणण्यासाठी गेले होते. वाघाने पती पूना यांना मारल्याने पत्नीवर दुःखाचा डोंगर कोसळले आहे. तिला आर्थिक मदतीची गरज आहे.

हेही वाचा: बुलडाण्यातील ‘टायगर’ला ५१ लाखांची मागणी; मात्र, मालकाला हवे एक कोटी

या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली असून वनविभागाच्या विरोधात रोष व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वनविभागाचे अधिकारी व गोरेगावचे पोलिस निरीक्षक यांनी पाहणी करून पंचनामा केला व शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.

परिसरात यापूर्वीही वाघाने एका इसमास जखमी केले होते. त्यामुळे सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. या घटनेची तपासणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे करण्यात येईल व योग्य निर्णय घेतला जाईल.
- प्रवीण साठवणे, वनपरिक्षेत्राधिकारी गोरेगाव

(Tiger-Attack-Man- killed-Gondia-Tiger-News-Crime-News-nad86)

loading image