Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात दोन ठार; सिंदेवाही, सावली तालुक्यांतील घटना, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Chandrapur Forest: सिंदेवाही व सावली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात महिला व गुराख्याचा मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मानव-वन्यजीव संघर्ष पुन्हा एकदा गंभीर बनल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.
सिंदेवाही : वाघाने हल्ला करून महिला, गुराख्यास ठार केले. ही घटना सिंदेवाही आणि सावली वनपरिक्षेत्रात घडली. मृतांत अरुणा ऊर्फ छाया अरुण राऊत (वय ४९ रा. सिंदेवाही) आणि पितांबर गुलाव सोयाम (वय ३६ रा. बेलघाटा) यांचा समावेश आहे.