आमगाव/साखरीटोला ( जि. गोंदिया) : आमगाव -देवरी महामार्गावर अंजोरा-रामपूर परिसरात शुक्रवारी ( ता. २०) दुपारी बारा वाजताच्या सुमारास एका वाघाने महामार्ग ओलांडून थेट शेजारील शेतात प्रवेश केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. .अचानक वाघ दिसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही माहिती मिळताच वनविभागाने गोंदिया व नागपूर येथून विशेष रेस्क्यू पथक मागवले. वनपरिक्षेत्र अधिकारी ए. एच. सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू पथकाने तातडीने कारवाई करत वाघाला सुरक्षितपणे जेरबंद केले. त्यानंतर त्याला अधिवासात सोडण्यात आले..दरम्यान, जंगलालगत जनावरे चारणे टाळावे, शक्यतो गटानेच शेतात वा जंगलालगत काम करावे, कोणत्याही वन्यप्राण्याच्या हालचाली दिसल्यास तत्काळ वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागाने केले आहे..‘कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून विभाग सज्ज आहे. रेस्क्यू ऑपरेशन नियोजनपूर्वक व यशस्वीरित्या पार पडले. नागरिकांनी घाबरून न जाता जागरूक राहावे, असेही वनविभागाने सांगितले. वाघ बघण्यासाठी अनेक नागरिक घटनास्थळी जमले होते. मात्र, वनविभागाने व पोलिस यंत्रणेने परिस्थितीवर नियंत्रण ठेवत रेस्क्यू ऑपरेशन यशस्वीपणे पूर्ण केले आहे..MPL 2025 : सांघिक कामगिरीच्या जोरावर यश : प्रशांत सोळंकी.उल्लेखनीय म्हणजे, १२ जून रोजी येरमडा-सोनेखारी परिसरात वाघाने एका लहान बैलावर हल्ला करून त्याला ठार केले होते. त्यामुळे हल्ला करणारा हाच तो वाघ नसावा ना? या दृष्टीनेही वनविभागाकडून पाहिले जात आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.