Tiger Attacksakal
विदर्भ
Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात पुन्हा शेतकऱ्याचा मृत्यू; पारशिवनी तालुक्यातील कालभैरव पेठ परिसरातील घटना
Vidarbha News: पारशिवनी तालुक्यात पुन्हा वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. मृतदेह जंगलात ओढत नेऊन फाडल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मानव-वन्यजीव संघर्षाचे वाढते स्वरूप अधोरेखित करते.
पारशिवनी : तालुक्यात शुक्रवारी वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याला ठार झाल्याची घटना ताजी असताना तालुक्यातील कालभैरव पेठ परिसरात शेतात बकऱ्या चारणाऱ्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला. यात त्याचा मृत्यू झाला.