Wildlife Protection: मेळघाट व्याघ्रप्रकल्पातील राजदेवबाबा कॅम्पमध्ये जंगलातील मजुरावर वाघाने हल्ला केला आणि त्याला ठार केलं. वाघाच्या हल्ल्यात मेळघाट जंगलातील काम करणाऱ्या प्रेम कासदेकरचा मृत्यू झाला, संबंधित विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल.
चिखलदरा/जामली : मेळघाट व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातील राजदेवबाबा कॅम्पवर रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरावर जंगलामध्ये वाघाने हल्ला करून त्याला ठार केले. प्रेम राजेश कासदेकर (वय ४०, रा. तारुबांदा), असे हत्या झालेल्या मजुराचे नाव आहे.