Tiger Attack in Melghat : मेळघाटात वाघाच्या हल्ल्यात वृद्ध ठार; वर्षभरातील चौथी घटना, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Melghat Forest News: मेळघाटातील शेवरीमुडा जंगलात लाकडे गोळा करताना ६० वर्षीय मन्नू जावरकर यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. वर्षभरात वाघाच्या हल्ल्याची ही चौथी घटना असून, गावकरी भयभीत झाले आहेत.
चिखलदरा/धारणी : इंधन गोळा करण्यासाठी शेवरीमुडा जंगलात गेलेल्या एका ६० वर्षीय वृद्ध व्यक्तीवर वाघाने हल्ला करून त्याला ठार मारल्याची खळबळजनक घटना मेळघाटात घडली. मन्नू बाबला जावरकर (वय ६०, रा. हरिसाल), असे त्या व्यक्तीचे नाव आहे.