
चिमूर : तेंदुपत्ता संकलनासाठी पती-पत्नी जंगलात गेले. तेंदूपत्ता तोडत असतानाच दबा धरून बसलेल्या वाघाने पतीसमोरच पत्नीवर हल्ला करून ठार केले. ही घटना बुधवार (ता. १४) सकाळी नऊ वाजताच्या सुमारास पळसगाव वनपरिक्षेत्रात येत असलेल्या करबडा येथील रोपवन कक्ष क्रमांक ८६२ मध्ये घडली. मृत महिलेचे नाव कचराबाई अरुण भरडे (वय ५४) असे आहे.