
मूल : येथील कर्मवीर महाविद्यालयाच्या परिसरात असलेल्या पंचायतराज प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात नुकतेच वाघाने भटकंती मारली. केंद्राच्या सीसीटिव्ही कॅमेरामध्ये रात्रीचे हे दृश्य कैद झाले आहे. इतर वन्यजीवांचाही या परिसरात संचार आहे. पंचायतराज प्रशिक्षण केंद्र आणि कर्मवीर महाविद्यालयाचा परिसर चंद्रपूर मार्गावर आहे.परिसरात डोंगरी भाग आहे. लागूनच प्रादेशिक आणि बफर झोनच्या झुडपी जंगलाचा परिसर आहे. या परिसरात नेहमीच वन्यजीवांचे आणि वाघाचे दर्शन अनेकांना झाले आहे. वाघाची भटकंती येथील नित्याचाच भाग झाला आहे.