वाघ अजूनही तपास यंत्रणेबाहेर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

वाडी (जि. नागपूर) :  फेटरी, येरला, बोरगाव, खडगाव क्षेत्रात 10 दिवसांपासून जंगल परिसरात फिरून आतापर्यंत चार प्राण्यांची शिकार करणारा वाघ अजूनपर्यंत वनविभागाच्या तपास यंत्रणेबाहेर असल्याची माहिती आहे. बोरगाव सीमेत शनिवारी वासराची शिकार केल्यानंतर वाघ जंगलात दिसेनासा झाला.

वाघाने शिकार केल्याची माहिती मिळताच वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोरगाव क्षेत्राची तपासणी सुरू केली. शिकार खाण्यासाठी वाघ पुन्हा येण्याची संभावना पाहता वनविभागाच्या तपास दलाने परिसरात सीसीटीव्ही बसविले. संभावित स्थानावर निरीक्षणही केले. परंतु, सायंकाळपर्यंत कोणतेच यश प्राप्त झाले नाही. वाघाने शिकार केल्यानंतर खाल्ली नाही. त्यामुळे तो पुन्हा शिकार करण्याची संभावना व्यक्त करण्यात येत आहे.
खडगाव परिसरात महिलेने वाघाला पाहिल्याने तपास मोहिमेचे सदस्य खडगावात पोहोचले. महिलांसोबत चर्चा केली; परंतु या क्षेत्रात वाघ, वाघांचे पदचिन्ह दिसले नाही, अशी माहिती तपास कार्यात लागलेले वन्यजीव व सर्पमित्र शशांक गजभिये यांनी दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The tiger still out of the investigation system