यवतमाळ - टिपेश्वरमधील ‘पीसी‘ वाघिणीनंतर आता पांढरकवडा प्रादेशिक वनविभागाच्या अखत्यारितील मुकुटबन रेंजमधील ‘टी 9’ वाघिणीच्या गळ्यात फास अडकल्याची माहिती असून वनविभागाचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.
जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्य व्याघ्रदर्शनाचे केंद्र म्हणून ओळखले जात आहे. टिपेश्वरला लागून असलेल्या पांढरकवडा प्रादेशिक विभागाच्या रेंजमध्येही वाघाचे अस्तित्व दिसून आले आहे. वणी, मुकुटबन, मारेगाव या भागात वाघाचे वास्तव्य आहे. वणी परिसरातच शॉक लागून वाघाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
वाघांची वाढलेली संख्येसोबतच ’शिकारी’ही सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. महिन्याभर्यापासून ’पीसी’ वाघिणीच्या गळ्यात फास अडकला आहे. अजूनही फास काढण्यात वनविभागाला यश आलेले नाही. श्रेयवादासाठी ओढताण होत असल्याची चर्चा परिसरात असून वाघिणीसह तीन बछड्याचा जीव अडकून आहे. असे असताना आता मुकुटबन रेंजमधील ‘टी 9’ वाघिणीच्या गळ्यातही फास अडकल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
तीन दिवसांपासून वनविभागाचे ऑपरेशन सुरू असल्याची माहिती आहे. वनविभागाशी संपर्क साधला असता वाघिणीला जखम झाली नसल्याचे सांगितल्या जात आहे. फासावर बोलण्यास वनविभागाकडून कुणीही तयार नाही. ‘पीसी’ वाघिणीचा फास अजूनही काढल्या नसल्याने आश्यर्च व्यक्त होत आहे.
पंधरा दिवसांपासून ‘पीसी’ची हुलकावणी
पीसी वाघीण गेल्या पंधरा दिवसापासून गळ्यात शिकारी फास घेऊन फिरत आहे. फास काढण्याकरिता अमरावती येथील दोन रेस्क्यू टीम आल्या आहेत. मात्र, अजूनही या टीमला पीसीचा फास काढण्यात यश आलेले नाही. यामुळे वनविभागाच्या कारभारावर प्राणीप्रेमी तसेच नागरिकांनी टीकेची झोड उडविली आहे.
आम्ही वाघिणीवर लक्ष ठेवून आहोत. वाघिणीला जखम झाली नाही. दररोज मॉनिटरिंग सुरू आहे.
- श्री. साळुंके, वनपरिक्षेत्र अधिकारी, मुकुटबन.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.