
गडचिरोली : विध्वंसक कारवाई करण्याच्या तयारीत असलेल्या पाच जहाल माओवाद्यांना गडचिरोली पोलिस दल व केंद्रीय राखीव पोलिस दल ( सीआरपीएफ)ने मंगळवार (ता. २०) ताब्यात घेतले. यात एक डिव्हीसीएम, एक एसीएम दर्जाच्या वरिष्ठ माओवाद्यांसह तीन प्लाटून सदस्य पदावरील जहाल माओवाद्यांचा समावेश आहे. त्यांना अबुझमाडच्या बिनागुंडा परिसरातून ताब्यात घेण्यात आले.