अमरावतीच्या त्रस्त व्यापाऱ्यांनी केली वेगळी मागणी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 14 जुलै 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सम-विषम (ऑड ऍण्ड इव्हन) पद्धतीने शहरातील व्यापाऱ्यांना दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र आता व्यापाऱ्यांनी ऑड ऍण्ड इव्हन पद्धती बंद करून आठवड्यातील पाच दिवस दुकाने सरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

अमरावती : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे व्यापारी वर्गांवर अनेक प्रतिबंध लावण्यात आले आहे. त्यापैकी एक म्हणजे दुकाने सुरू ठेवण्यासाठी आखलेली उपाययोजना. मात्र, या उपाययोजनेमुळे व्यापारी वर्ग त्रस्त झाला असून त्यांनी पाच दिवस दुकाने सुरू ठेवण्याची मागणी केली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सम-विषम (ऑड ऍण्ड इव्हन) पद्धतीने शहरातील व्यापाऱ्यांना दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र आता व्यापाऱ्यांनी ऑड ऍण्ड इव्हन पद्धती बंद करून आठवड्यातील पाच दिवस दुकाने सरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यासंदर्भात अमरावती महानगर मर्चंट्‌स ऍण्ड इंडस्ट्रीजच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. शासनाने पाच जूनपासून अमरावती शहरात पी-1, पी-2 प्रणालीने व्यापार सुरू करण्यास परवानगी दिली. मात्र या पद्धतीने एका महिन्यात केवळ 10 दिवसच एक दुकान सुरू राहू शकते, त्यामुळे व्यावसायिकांना दुकानचा खर्चसुद्धा परवडत नाही, अशी तक्रार व्यापाऱ्यांनी केली.

वाचा - नागपूर महापालिकेचे दिव्याखाली अंधार; न्यायालयाने दिले हे आदेश...

व्यापाऱ्यांना सोमवार ते शुक्रवार, असे पाच दिवस दुकाने सुरू ठेवण्यास मुभा देण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. यापूर्वी कोरोनाच्या लॉकडाउनमुळे व्यापारजगत बंद असल्याने आधीच व्यापारी हैराण झाले आहेत आणि आता पुन्हा ऑड ऍण्ड इव्हनमुळे त्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे सहा महिन्यांचे पाण्याचे बिल तसेच संपत्ती करातून व्यापाऱ्यांना सूट देण्यात यावी, अशी मागणीदेखील या वेळी करण्यात आली. निवेदन देतेवेळी चेंबरचे अध्यक्ष सुरेश जैन, सचिव घनश्‍याम राठी, प्रकाश बोके, जयंत कामदार, गौरीशंकर हेडा, अतुल कळमकर, बकुल कक्कड, सुदीप जैन, सुरेंद्र पोपली, अशोक राठी आदींसह अन्य व्यापारी उपस्थित होते.

संपादन - नरेश शेळके


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Traders Demands to open the Shop for Five Days