Holi Celebration : बंजारा समाजात आजही जपले जाते अस्सल होळीचे वेगळेपण; लेंगी गीत गाऊन करतात पारंपरिक होळी साजरी

बंजारा समाजाची होळी साजरी करण्याची पद्धत अनोखी आणि वैशिष्ट्यपूर्ण असून त्यांनी आपली प्राचीन परंपरा अजूनही जोपासली आहे.
sindkhedraja banjara mahila lengi song dance
sindkhedraja banjara mahila lengi song dancesakal
Updated on

सिंदखेड राजा - बंजारा समाजाची होळी साजरी करण्याची पद्धत अनोखी आणि वैशिष्ट्यपूर्ण असून त्यांनी आपली प्राचीन परंपरा अजूनही जोपासली आहे. रंगबेरंगी पारंपरिक वेशभूषा करून स्त्री-पुरुष लहान-थोर होळी भोवती वर्तुळाकार करून नाचतात. तांड्यावर होळीचे रंग उधळले जातात. होळीच्या या गीतांना 'लेंगी गीत' असे म्हणतात.

'होळी रे मारी बंबड़ भोळी

भर गेरीया रं झोळी ये

होळी रे मारी होळी रे

भर गेरीया रं झोळी ये'

या लेंगी गीतावर महिलांनी चांगलाच ठेका धरल्यांचे पहायला मिळत होते.बंजारा नागरीक व महिलांना लेंगी महोत्सव ही एक सांस्कृतिक पर्वणी असते. डफाच्या तालावर ही पारंपरिक लेंगी गीत गात, नृत्य करीत बंजारा समाजाची होळी वैशिष्ट्यपूर्ण व उत्साहवर्धक असते.

लेंगी गीतातून बंजारा समाजाच्या प्रथा रूढी व परंपरा या संस्कृतीचे दर्शन घडते. तालुक्यातील जयपूर तांडा येथे बंजारा समाजाने हा सण आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करत त्याचे अस्सलपण पण टिकवून ठेवले आहे.

लोककलेचा सुंदर आविष्कार या निमित्ताने तांड्यावर पाहायला मिळतो.जयपूर तांडा येथील लहान व्यक्ती पासून ते मोठ्या व्यक्तीपर्यंत उत्साहात सामील झालेले होते. बाहेरगावी गेलेली मंडळीही गावाकडे होळीसाठी गावांमध्ये आलेले दिसून आले. त्यामुळे बंजारा समाजात एकात्मता निर्माण झाल्याचे दर्शन पाहायला मिळाले.

समाजाची प्रगती साधण्यासाठी बंजारा समाजाच्या लोककला रूढी आणि परंपरा प्रवाहित राहण्यासाठी होळी उत्सव बंजारा समाज जीवनाचे अंग ठरला आहे. परंपरेने चालत आलेली लेंगी डफ नगारा अशा वाद्यावर चाललेला लोक समूहाचा नुत्यमय आविष्कार पारंपरिक, वेशभूषा, केशभूषा बंजारा समाजातील आगळेवेगळे आकर्षण ठरते,

दरम्यान होळी गीताचे वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे महिला व पुरुष सारेच हे गीत एकत्र गातात विशेषता महिला गीत गाताना एकरूप होऊन तन्मयतेने नाचू लागतात. होळीचे लोक संस्कृतीच्या प्रवाहात रीतीरिवाचा मेळ घातला गेला आहे.

यावेळी जयपूर तांडा येथील शेकडो महिला पुरुष लेंगी गीता मध्ये सहभागी झाले होते, तर तांडा मधील प्रत्येक घरासमोर बंजारा लेंगी गीत गाऊन लेंगी गीतावर नाचून बंजारा लेंगी गीतांमध्ये महिला व पुरुष रंगून केल्याचे पहायला मिळत होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com