esakal | चालान करत होता वाहतूक पोलिस, अन् घडला विचित्र अपघात
sakal

बोलून बातमी शोधा

trafic police accident

राष्ट्रीय महामार्गावर अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या टवेरा गाडीवर कारवाई करत असताना मागून येणार्‍या भरधाव ट्रकने (क्र. एमएच १५ एफव्ही ६१७७) टवेरा गाडीला जबर धडक दिली. यावेळी सुनील मेश्राम टवेरा गाडीसमोर गाडीचे कागदपत्र तपासत उभे होते. ट्रकच्या धडकेमुळे टवेरा गाडीची मेश्राम यांना धडक बसली.

चालान करत होता वाहतूक पोलिस, अन् घडला विचित्र अपघात

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

लाखनी (जि. भंडारा) : तालुक्यातील गडेगाव महामार्ग पोलिस केंद्रासमोर आपले कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक पोलिस कर्मचार्‍यास भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातात पोलिस शिपायाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. सुनील महादेव मेश्राम (वय ५२, ब.नं. ५९) असे मृत वाहतूक पोलिस नायकाचे नाव आहे.

सुनील मेश्राम दररोजप्रमाणे ड्युटीवर पोहोचले. त्यांनी कामाला देखील सुरुवात केली. दरम्यान, राष्ट्रीय महामार्गावर अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या टवेरा गाडीवर कारवाई करत असताना मागून येणार्‍या भरधाव ट्रकने (क्र. एमएच १५ एफव्ही ६१७७) टवेरा गाडीला जबर धडक दिली. यावेळी सुनील मेश्राम टवेरा गाडीसमोर गाडीचे कागदपत्र तपासत उभे होते. ट्रकच्या धडकेमुळे टवेरा गाडीची मेश्राम यांना धडक बसली.

पानटपरीवाल्याने चक्क मंत्र्यालाचा दिला ‘गुटखा’

वाहतूक पोलिस नायकास भरधाव वाहनाने  उडविले
या अपघातात सुनील मेश्राम जागीच ठार झाले. अपघातानंतर टवेराचालक गाडीसह घटनास्थळावरून पसार झाला असून धडक देणारा ट्रक लाखनी पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तर ट्रक चालक पसार झाला आहे. घटनेची नोंद लाखनी पोलिसांनी केली असून तपास पोलिस निरीक्षक दामदेव मंडलवार यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय कोरचे करीत आहेत.

loading image