Motala News : अक्षता टाकण्यापूर्वीच वरपित्याचा मृत्यू..! माजी सैनिकांची मानवंदना; परिसरात हळहळ

एकुलत्या एक मुलाचे नानमुख.. घरावर स्वतः विद्युत रोषणाई केली. दुपारी मेहंदीची गडबड.. चार वाजता महिलांना बांगड्या भरण्याच्या कार्यक्रमाची लगबग आणि अचानक....
Ashok Sarkate

Ashok Sarkate

sakal

Updated on

- अर्चना फाटे

मोताळा - शनिवारी एकुलत्या एक मुलाचे नानमुख.. घरावर स्वतः विद्युत रोषणाई केली. दुपारी मेहंदीची गडबड.. चार वाजता महिलांना बांगड्या भरण्याच्या कार्यक्रमाची लगबग आणि अचानक घरातून रडण्याचा आणि किंचाळण्याचा आवाज आला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वर पित्याचा मृत्यू झाला आणि अचानक आनंदाचे वातावरण दुःखात परावर्तित झाले. हा हृदयद्रावक प्रसंग घडला शहरातील प्रभाग क्रमांक १५ मधील सर्वेश्वर नगरात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com